
पर्यावरणाचा ऱ्हास करत अदानी कंपनीला रायगड जिह्यातील अंबा नदीच्या शेजारी सिमेंट वाहून नेण्यासाठी जेट्टी व कॉन्व्हेअर बेल्ट उभारायचा असून या प्रकल्पासाठी 158 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. अदानी कंपनीला झाडे तोडण्याची हायकोर्टाने परवानगी दिली असली तरी नियामक प्राधिकारणांनी घातलेल्या अटींचे काटेकोर पालन करण्यास बजावले आहे.
समुद्रमार्गे सिमेंट वाहून आणण्यासाठी रायगडमध्ये जेट्टी व कन्व्हेयर बेल्ट उभारायचे असून या कामाच्या आड 158 कांदळवन येत आहेत त्यामुळे ती तोडण्याची परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात अदानी सिमेंटेशन लिमिटेड कंपनीने याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. खंडपीठाने झाडे तोडण्यास परवानगी देताना पर्यावरण संवर्धनासह विकासाचा समतोल राखण्यास बजावले.