केरळमध्ये फटाक्याच्या गोदामात भीषण स्फोट, 150 जखमी; 10 गंभीर

केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान फटाक्याच्या गोदामात भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत दीडशेहून अधिक जखमी झाले असून दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, असेही पोलीस म्हणाले.

वार्षिक कालियाट्टम उत्सवासाठी दीड हजार लोक मंदिरात जमले होते. या ठिकाणी फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू होती. त्याचवेळी ठिणग्या फटाक्यांच्या गोदामापर्यंत पोहोचल्या आणि आग लागून भीषण स्फोट झाल्याचे समोर आले आहे. गोदामात 25 हजार रुपये किमतीचे फटाके ठेवण्यात आले होते. या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, मंदिर समितीने फटाके पह्डण्याचा परवानाही घेतलेला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.

n स्पह्टात 150 हून अधिक नागरिक जखमी झाले असून 108 जणांना कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे जिह्यात आणि मंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

n स्पह्टानंतर सर्वत्र किंकाळय़ा, आरडाओरडा ऐकू येत होता. सर्वजण सैरावैरा पळू लागले. पळण्याच्या नादात अनेकजण पडून जखमी झाले, अशी माहिती अपघातात जखमी झालेल्या एका महिलेने दिली.

n गंभीर जखमी झालेले नागरिक तब्बल 80 टक्के भाजल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. स्पह्टाचे नेमके कारण समजले नसून ते शोधण्यासाठी घटनास्थळावरून पोलिसांनी पुरावे गोळा केल्याचे ते म्हणाले.