एसटी बँकेत 150 कोटींचा मोठा घोटाळा झाल्याची बातमी समोर येत आहे. वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालकांनी हा घोटाळा केल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेने केला. नोकरभर्ती आणि बोनस घोटाळ्यातील 43 लाखांची रक्कम ही सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या खात्यात संचालकांनी जमा केली, असा आरोपही कामगार संघटनेने केला आहे. त्यांनी या संदर्भातील पुरावे देखील सादर केले आहेत. हे गंभीर आरोप एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी केली केले आहेत.
याप्रकरणी शिवनाथ डोंगरे यांनी तक्रार दाखल केली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, एसटी बँकेचे संचालक सुरेंद्र उके यांनी त्यांच्या पत्नी सुप्रिया उके यांच्या नावावर हे पैसे घेतले, असा आरोप आहे.
याबाबत बोलताना एसटी कामगार संघटनेने (Maharashtra State Transport Kamgar Sanghatana) म्हटलं आहे की, जयश्री पाटील यांच्या खात्यात संचालक मगरे, सितापराव, उके आणि घकाते यांनी 43 लाख जमा केले. एसटी बँक भर्ती घोटाळ्यातील पैसे परत मागितल्यामुळे एका संचालकाने तक्रारदार शिवनाथ डोंगरे यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ त्यांनी माध्यमांसमोर सादर केला.