हिंदुस्थानी वाघांची चीनमध्ये तस्करी

पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भात गेल्या काही वर्षांपासून वाघांची तस्करी सुरू असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यामध्ये म्यानमारमार्गे  गेल्या चार महिन्यांत हिंदुस्थानातून किमान 15 वाघांची चीनमध्ये  तस्करी झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या अजित राजगोंडला अटक करून वन विभागाच्या विशेष तपास पथकाने शिकारी टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधून काढले आहे. वाघांच्या शिकारीच्या मोबदल्यात बहेलिया टोळीला पैसा पुरविणाऱया मिझोराम राज्याची राजधानी आयजोल येथून जमखानकप नावाच्या एका व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली होती, तर याआधी मेघालय राज्याची राजधानी असलेल्या शिलाँग येथून लालनेईसंग आणि निंग सॅन लुन यांनादेखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पूर्वेत्तर राज्यातील या तीन आरोपींच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती आता समोर आली.