मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आज 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्यामुळे येथील 20 पैकी 6 पंप बंद झाले आहेत. दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले तरी त्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.