
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिह्यातील एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने हायब्रिड थ्री-इन-वन सायकल करून सर्वांचे लक्ष वेधले. गगनचंद्रने बनवलेली ही सायकल सौर ऊर्जा, पेट्रोल आणि बॅटरीवर चालू शकते. त्याने देशी जुगाड करत सामान्य सायकलचे हाय-टेक हायब्रिड बाईकमध्ये रूपांतर केले.
इलेक्ट्रिक बॅटरी, सौर पॅनेल आणि मोटार लावल्यामुळे या सायकलला स्टायलिश बाईकचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. याशिवाय डिजिटल स्पीडोमीटर, सेंट्रल लॉक सिस्टम, जीपीएस ट्रकिंग यांसारखी फिचर्स जोडण्यात आली आहेत. एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ही सायकल 25 किमी अंतर गाठू शकते आणि सौर ऊर्जेवर एक दिवस चालू शकते. दरम्यान, ही अनोखी सायकल बनवण्यासाठी गगनचंद्रला 20 हजार रुपये मोजावे लागले. इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या गगनचंद्रच्या या कलेची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने पुद्दुचेरी येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेत 250 विद्यार्थ्यांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.