
गिरगावातील खेत वाडीतील 135 कर्षे जुन्या पितळे मारुतीची जागा बदलण्यात येणार आहे. येथील पुनर्विकासासाठी हे केले जाणार आहे. ही मारुतीची मुर्ती हलवल्यास हिंदुंच्या भावना दुखावल्या जातील, अशी विनंती करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले होते. न्यायालयाने कोणतेही अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे.
येथील पितळे मारुतीचे मंदिर 1883 मध्ये बांधण्यात आले आहे. अनेक भक्त येथे पुजा करण्यासाठी येतात. हे मंदिर भक्तांचे श्रद्धा स्थान आहे. येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. पुनर्विकासासाठी हे मंदिर तोडले जाणार आहे. येथील प्राचीन मुर्ती हलवली जाणार आहे. न्यायालयाने त्यास परवानगी दिली आहे.
त्याविरोधात खेतवाडी खंबाटा लेन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अर्ज दाखल केला होता. मारूतीची मुर्ती हलवण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावेळी अनेक गोष्टी न्यायालयासमोर सादर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आमचे म्हणणे ऐकून घेईपर्यंत ही मुर्ती तेथून हलवू नये, अशी विनंती मंडळाने केली. न्या. अजय गडकरी क न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने यात कोणतेही अंतरिम आदेश नकार दिला. तसेच न्यायालयाने हा अर्ज निकाली काढला.
स्वंयभू मारुती
ही मुर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू मुर्ती हलवताता येत नाही. मानवाने प्रतिष्ठापना केलेली मुर्ती जागेवरून काढता येते. त्यामुळे स्वंयभू मारुती येथून हलवू नये, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती.