पंजाबमध्ये 13 दहशतवाद्यांना अटक

terrorist

पंजाब पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित 13 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये 1 अल्पवयीन आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 2 रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड, 1 ग्रेनेड लाँचर, 2.5 किलो वजनाचे दोन इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस, डेटोनेटर्स, 2 हँडग्रेनेड, रिमोट पंट्रोल आणि 2 किलो आरडीएक्स, 5 पिस्तूल, 6 मॅगझिन, 44 काडतुसे, 1 वायरलेस सेट आणि 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.