6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी मोठ्या प्रमाणात आंबेडकरांचे अनुयायी दादरच्या चैत्यभुमीला भेट देतात. आंबेडकरी अनुयायांसाठी मध्य रेल्वेने 12 विशेष गाड्यांची सोय केली आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रात्री 12.45 मिनिटांनी कुर्ल्याहून परेलसाठी पहिली लोकल सोडली जाईल. तर कल्याणहून परेलसाठी रात्री एक वाजता दुसरी लोकल आणि ठाण्यावरून रात्री 2.10 वाजता तिसरी लोकल सोडली जाईल.
डाऊन मार्गावर परळ-ठाणे ही विशेष लोकल 1.15 मिनिटांनी सोडली जाईल, तर दुसरी लोकल ही परळ- कल्याण 2.55 मिनिटांनी सोडली जाईल. परळ ते कुर्ला ही तिसरी लोकल 03.05 वाजता सोडली जाईल
हार्बर मार्गावर वाशी ते कुर्ला, पनवेल कुर्ला या गाड्या सोडल्या जातील.