गडचिरोली येथील वांडोली गावाजवळ पोलीस आणि कमांडोसोबत आज झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, आज दुपारी सी 60 तुकडीतील कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये वांडोली गावाजवळ सहा तास जोरदार गोळीबार सुरू होता. नक्षलवाद्यांनी माघार घेतल्यावर घटनास्थळी पोलिसांना 12 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. शिवाय 3 एके-47, 2 इन्सास रायफल, एक कार्बाइन आणि एक एसएलआरसह सात स्वयंचलित शस्त्रsही पोलिसांनी जप्त केली आहेत.
51 लाखांचे बक्षीस जाहीर
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी C60 कमांडो टीम आणि गडचिरोली पोलिसांसाठी 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असे पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
टिपागड दलमचा प्रमुख ठार
मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम लक्ष्मण आत्राम उर्फ विशाल आत्राम हा टिपागड दलमचा प्रमुखही आहे. त्याच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. इतर माओवाद्यांची पुढील ओळख पटवणे सुरू असून, परिसरात शोधसत्र सुरू आहे.