जॉर्जियामधील एका रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जॉर्जियातील भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेची पुष्टी केली आहे. कार्बन मोनोऑक्साईडमुळे सर्वांचा मृत्यू झाल्याचा दावा जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे केला आहे.
प्राथमिक तपासात मृतांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा हिंसाचाराच्या खुणा आढळल्या नाहीत, असेही मंत्रालयाने नमूद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जॉर्जियाच्या गुदौरी माउंटन रिसॉर्टमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये सर्वांचे मृतदेह आढळले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. तपासाअंती खरे कारण समोर येईल.