पश्चिम रेल्वेकडून दसरा-दिवाळी काळातच 12 कोटींची वसुली

दसरा, दिवाळीच्या काळात अनेक प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने एकटय़ा ऑक्टोबर महिन्यात 12 कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. लोकल, रेल्वेगाडय़ा, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाडय़ांमधून तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथक सज्ज केले आहेत. तिकीट तपासनीसांच्या पथकांनी गेल्या सात महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून 80.56 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांकडून 26.60 कोटी रुपयांची दंडवसुली केली.