शिवसेना पक्षप्रमुख , माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना डोंबिवली शहर आणि ठाणे जिल्हा पॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुभम हॉल येथे ठाणे जिल्हा मानांकन स्पर्धा 26 ते 28 जुलै दरम्यान आयोजित केली होती . या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ आणि माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते झाला . तर कल्याण लोकसभा संपर्पप्रमुख गुरुनाथ खोत यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन केले . तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत असोसिएशनच्या माध्यमातून 12 क्लब आणि 400 खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ही पॅरम स्पर्धा 14 वर्षाखालील , 17 वर्षाखालील , 21 वर्षाखालील , पुरुष एकेरी , महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी अश्या 6 गटात खेळवली गेली.
सदर गटांचे विजेते खालीलप्रमाणे – 14 वर्षाखालील गटात निधी सावंत आणि अबुझर अन्सारी , 18 वर्षाखालील गटात मधुरा देवळे आणि अथर्व म्हात्रे , 21 वर्षाखालील गटात समृद्धी घाडीगांवकर आणि आयुष कातळकर , मिश्र दुहेरीत समृद्धी घाडीगांवकर आणि झैद अहमद , महिला एकेरी समृद्धी घाडीगांवकर , पुरुष एकेरी झैद अहमद .या स्पर्धेत समृद्धी घाडीगांवकर हिने तिहेरी तर झैद अहमद याने दुहेरी मुकुट प्राप्त केला .
रविवारी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ , जिल्हा संघटीका वैशाली दरेकर-राणे , सहसंपर्प प्रमुख अरविंद बिरमोळे , युवा जिल्हाअधिकारी प्रतिक पाटील , असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश चव्हाण , सचिव दळवी आणि आंतरराष्ट्रीय पंच आशिष बागकर डोंबिवली पूर्व शहरप्रमुख अभिजित सावंत आणि ग्राहक संरक्षण कक्ष शहर संघटक धनंजय चाळके यांच्या हस्ते पार पडला . याप्रसंगी डोंबिवलीतील रसिक प्रेक्षक , शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.