
हिंदुस्थानात 119 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा आणि सार्वभौमत्व या मुद्द्यांना डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या 119 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. ते सर्वच्या सर्व अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर कार्यरत होते. केंद्र सरकारने हे सर्व अॅप्स तत्काळ गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. यातील बहुतांश अॅप्स हे व्हिडीओ, व्हॉइस चॅट प्लॅटफॉर्म, चीन आणि हाँगकाँगच्या डेव्हलपर्सशी जोडलेले होते, असे सरकारने म्हटले आहे.1