विधानसभेच्या 113 जागा पाडणार – मनोज जरांगे

ज्यांनी ज्यांनी मराठा समाजास त्रास दिला, ज्यांनी मराठा समाजाच्या मुलांकडे पहिले नाही त्यांना मराठे पाडू शकतात. मराठा समाज विधानसभा निवडणुकीत 113 जणांना पाडणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले.

आपण भाजपचे नाव घेतले नाही. फक्त 113 पाडणार, असे म्हणालो. त्यांचे नाव घ्यायला ते काय देवदूत आहेत का? उद्या सत्ता कोणाची येऊ द्या, दोन हात करायची ताकद मराठा समाजामध्ये आहे. आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहोत. आम्हाला राजकारणाचा नाद लावून घ्यायचा नाही, असे जरांगे म्हणाले.

मराठा समाजास सर्व कळते

मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रिय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहेत. या लोकांचा 25 दिवसांचा पोळा संपला की आम्ही आमचे आंदोलन सुरू करणार आहोत. आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे आणि सहा कोटी मराठय़ांना खेटणे सोपे नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.