मणिपूरमध्ये सुरक्षा दलांचे आणखी 11 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. लष्कराच्या 90 तुकडय़ांच्या 1 हजार 800 जवानांना तैनात करण्याचा निर्णय यापुर्कीच घेण्यात आला आहे, अशी माहिती मणिपूरचे सुरक्षा सल्लागार प्रमुख कुलदीप सिंह यांनी दिली आहे. विविध तुकडय़ा वेगवेगळ्या पाठकण्यात येत आहेत. लवकरच संपूर्ण परिसरात सुरक्षा जवान तैनात करण्यात येतील असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान मणिपूरमध्ये तणावाचे वातावरण असताना आज न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांना मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली.
मणिपूरमध्ये सीआरपीएफ, एसएसबी, आसाम रायफल, आयटीबीपीसह विविध सुरक्षा दलांच्या तुकडय़ा तैनात करण्यात येतील. बेपत्ता झालेल्या सहा नागरिकांचे मृतदेह नदीत सापडल्यानंतर मणिपूरमधील नागरिक प्रचंड आक्रमक झाले होते. आक्रमक झालेल्या जकानांनी 16 नोक्हेंबर रोजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि 17 आमदारांच्या घरावर हल्ले केले. मंत्री एल सुसींद्रो यांच्या घरालाही लक्ष्य करण्यात आले. आता सुसींद्रो यांनी आपल्या घरासभोवताली काटेरी तारांचे कुंपण लावले आहे. आपल्या संपत्तीचे रक्षण करणे हा आपला घटनात्मक अधिकार आहे. जर जमावाने पुन्हा हल्ला केला तर त्याचे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.