जॉर्जियातील रेस्टॉरंटमध्ये 11 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू

जॉर्जियातील गुडौरी येथील माऊंटन रिसॉर्टमधील रेस्टॉरंटमध्ये 11 हिंदुस्थानी नागरिकांसह 12जणांचा मृत्यू झाला. एका लहानशा खोलीत जनरेटर वापरल्याने कार्बन मोनोऑक्साइड पसरला. श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्बिलिसीतील हिंदुस्थानच्या दूतावासाने 11 जणांच्या मृत्यूची माहिती निवेदनाद्वारे दिली. दूतावास स्थानिक अधिकाऱयांकडून तपशील घेत आहे. आम्ही शोकग्रस्त कुटुंबांच्या संपर्कात असून शक्य ते सर्व सहकार्य करू, असेही दूतावासाने निवेदनाद्वारे म्हटले.