टाकाऊपासून टिकाऊ, 100 वर्षे जुन्या ट्रेनचा डबा बनला आलिशान हॉटेल

अमेरिकेतील इडाहो येथील 27 वर्षीय इसाक फ्रेंच याने कमालच केली आहे. इसाक फ्रेंचने 100 वर्षे जुना ट्रेनचा डबा 2.5 लाख रुपयांना खरेदी केला आणि त्याचे सुंदर हॉटेलमध्ये रूपांतर केले. आता याच हॉटेलच्या माध्यमातून तो वर्षाला एक कोटी रुपयापर्यंत कमाई करत आहे. ट्रेनचा शंभर वर्षे जुना डबा एका शेतकऱयाकडे भंगार म्हणून पडून होता. इसाकने अडीच लाख रुपये मोजून तो खरेदी केला. डब्याची अवस्था बिकट होती. डबा अतिशय खराब झालेला होता. त्यामध्ये 20 मांजरी राहत होत्या. डब्याचे रूपडे पालटण्यासाठी इसाक आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुमारे 1.2 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये रंगरंगोटी, डेक बांधणे, वायरिंग, फर्निचर आदी कामांचा समावेश होता. अशा तऱहने त्याने डब्याला आलिशान हॉटेलमध्ये बदलून टाकले. एक पॅसेंजर रूम, एक लिव्हिंग रूम, बेडरूम्स, कार्गो एरिया, सामान ठेवण्याची रूम, स्लायडिंगचा दरवाजा असलेले बाथरूम त्याने बनवले. हॉटेलात बसण्यासाठी लाकडी फर्निचरची राजेशाही व्यवस्था केलीय. अल्पावधीत इसाकचे हॉटेल लोकप्रिय झाले. हॉटेलात एक रात्र घालवण्यासाठी 27 ते 29 हजार रुपये मोजायला लोक तयार असतात.