
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015 मध्ये मोठा गाजावाजा करत 100 स्मार्ट सिटी मिशनची घोषणा केली होती. या मिशन अंतर्गत देशातील शंभर शहरांना स्मार्ट सिटी बनवण्यात येणार आहे. परंतु या घोषणेला 10 वर्षे उलटून गेल्यानंतरही हा प्रोजेक्ट अद्याप पूर्ण झालेला दिसत नाही. उलट या स्मार्ट सिटी मिशनवर आतापर्यंत तब्बल 1.64 लाख कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. 1.64 लाख कोटी रुपये खर्च होऊनही देशातील 100 स्मार्ट सिटी जशा दिसायला हव्यात तशा अद्याप कोणत्याही शहरात दिसत नाहीत. शहरे ज्या पद्धतीने विकसित व्हायला हवी होती तीसुद्धा झालेली दिसत नाहीत. त्यामुळे या प्रोजेक्टवर आणखी किती पैसे खर्च करण्यात येणार आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. 100 शहरात आतापर्यंत 8 हजारांहून अधिक मल्टी सेक्टरोल प्रोजेक्टवर काम सुरू असल्याची माहिती सरकारकडून देण्यात येत आहे. यात 90 टक्के काम पूर्ण केल्याचा दावासुद्धा केला जात आहे. 1.64 लाख कोटी रुपये खर्च फक्त देशातील 21 प्रमुख शहरांत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एसबीआय संशोधनाने यासंबंधी एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, स्मार्ट सिटी मिशनमध्ये फंडिंगची समस्या येत आहे. म्युनिसिपल बॉण्डचे प्रदर्शनसुद्धा कमकुवत दिसले. शहरांकडे फंडिंगसाठी वेगवेगळे स्रोत उपलब्ध आहेत. परंतु राज्यांत जी प्रगती दिसायला हवी होती ती दिसली नाही. डिसेंबर 2023 पर्यंत 100 स्मार्ट शहरांत केवळ 6 टक्के योजनांना पब्लिक-खासगी पार्टनरशीप (पीपीपी) द्वारे फंडिंग मिळवण्यात यश आले. तर याचे टार्गेट 21 टक्के होते. याशिवाय, भोपाळ, हुबळी-धारवाड, कोच्ची, विशाखापट्टणम, चंदिगड आणि श्रीनगरसारख्या 6 शहरांत केवळ 5 हजार 298 कोटींचे कर्ज मिळवता आले.
स्मार्ट सिटी मिशन काय?
स्मार्ट सिटी मिशन ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील 100 शहरे पूर्णपणे बदलण्यासाठी उचललेले पाऊल आहे. 100 शहरांतील जीवनस्तर बदलणे, स्वच्छ व टिकाऊ पर्यावरण देणे, स्मार्ट साधनांचा उपयोग करणे, शहरांचा पुनर्विकास करणे, शहरांना अधिक स्मार्ट बनवणे, पाच वर्षांत शहरांचा चेहरामोहरा बदलणे यासह अनेक वेगवेगळे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट सिटी मिशन आणण्यात आले होते.
- या योजने अंतर्गत शहरातील स्मार्ट रस्त्यांकर फोकस करणे, ट्रफिक सिस्टम अद्याकत करणे, पाण्याची पाईपलाईन आणि स्कच्छतेकर फोकस करणे, रस्ते चकचकीत करणे, कीज पुरकठा सुरळीत सुरू ठेकणे या प्रमुख मुद्दय़ांचा समाकेश आहे. तर दुसरीकडे 100 स्मार्ट सिटी मध्ये उत्तर प्रदेशातील काराणसी, लखनऊ, कानपूर, प्रयागराज, आग्रा, झांसी, सहारनपूर, बरेली, अलीगड, मुरादाबाद या 10 शहरांचा समाकेश आहे.