
मुंबईतील मानखुर्द भागातील जनता नगरमधील एका घरात सिलिंडरचा ब्लास्ट झाला असून या स्फोटात एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक महिला देखील 70 टक्के होरपळली आहे. खुशी खान असे त्या मुलीचे नाव असून तिला रुग्णालयात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
सोमवारी साडेआठच्या सुमारास जनता नगरमध्ये आग लागल्याचा अलर्ट अग्निशमन दलाला मिळाला. काही मिनिटातच दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग विझवली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या खुशी खान (10) आणि फराह खान (25) या दोघींना चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र खुशी हिचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.