इस्रायलच्या हवाई हल्ल्यादरम्यान इराणमध्ये मोठा हल्ला, गोळीबारात 10 सैनिक ठार

इराणमधील सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील तुफ्तान भागात गोळीबाराची घटना घडली आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांदरम्यान झालेल्या या हल्ल्यामुळे इराणच्या अडचणी वाढल्या आहेत. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात इराणच्या फराजा फोर्सचे 10 जवान ठार झाले आहेत.

अद्याप या हल्ल्यातील संशयितांची ओळख पटलेली नाही किंवा कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सरकारी एजन्सीनेही अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. लवकरत याबाबत सविस्तर निवेदन जारी करण्यात येईल, असे स्थानिक मीडिया आणि राज्य वृत्त एजन्सी IRNA ने सांगितले.

आम्हाला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ. आम्ही घाईत काही करणार नाही, अशी प्रतिक्रिया इराणचे खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे सदस्य अहमद अज्जाम यांनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांवर भाष्य करताना दिली.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दोन जण ठार

इस्त्रायलने शनिवारीच इराणच्या काही लष्करी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला.