दहा रुपयांची पाण्याची बाटली शंभरला विकली

बंगळुरूमध्ये 10 रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली 100 रुपयांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. एका जागरुक ग्राहकाने हे प्रकरण उघडकीस आणले. पल्लब डे असे त्यांचे नाव असून ते टेक एक्सपर्ट आहेत.

एका कॉन्सर्टदरम्यान त्यांनी पाण्याची बाटली विकत घेतली. त्यासाठी त्यांना झोमॅटोला शंभर रुपये मोजावे लागेल. पल्लब डे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या प्रकाराला वाचा फोडली. त्यांनी पाण्याच्या बाटलीचा आणि बिलाचा फोटो शेअर केला. पाण्याच्या बाटलीवर एमआरपी 10 रुपये असे लिहिलेले दिसत आहे. तरीही झोमॅटोने त्यांच्याकडून 100 रुपये घेतले.