मुंबईतील 10 टक्के पाणीकपात मागे

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया पिसे येथील न्युमॅटिक गेट सिस्टममध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात  आल्यामुळे मुंबईसह ठाणे, भिवंडीत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजपासून पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यास सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. पिसे येथील न्युमॅटिक गेट सिस्टममध्ये 30 नोव्हेंबर रोजी बिघाड झाला होता. हा तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दुरुस्तीचे काम एक- दोन दिवसांत पूर्ण करण्यात आले  असून  आता पाणी पुरवठय़ाची संपूर्ण यंत्रणा पूर्ववत झाल्याने दहा टक्के पाणीकपात रद्द करीत असल्याचे पालिकेने म्हटले आहे.