सीआयएसएफ, बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण

अग्निवीर योजनेवरून विरोधकांसह देशभरातून सातत्याने टीका होत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडीयाने याच मुद्दय़ावरून भाजपाला घेरले. त्यानंतर आता एनडीए सरकारने सीआयएसएफ, बीएसएफमध्ये माजी अग्निवीरांसाठी कॉन्स्टेबल पदाच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान,माजी अग्निवीर जवानांच्या भरतीवेळी शारीरिक चाचणीत शिथीलता दिली जाणार आहे.