उत्तर प्रदेशात दहा लाखांची कबुतरे चोरीला

उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील मोहम्मद कय्युम यांची 400 कबुतरे चोरीला गेली आहेत. या कबुतरांची किंमत तब्बल 10 लाख रुपये आहे. या ठिकाणी देशी-विदेशी प्रजातीची शेकडो कबुतरे आहेत. कय्युम यांनी पोलीस स्टेशन गाठत रीतसर तक्रार दाखल केली.