शेअर बाजारातील घसरणीमुळे 10 बऱ्या गुंतवणूकदारांचे 81 हजार कोटींचे नुकसान

शेअर बाजारातील गेल्या काही महिन्यांपासूनच्या घसरणीमुळे 10 बऱ्या गुंतवणूकदारांचे तब्बल 81 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या अव्वल गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओचे मूल्य 1 ऑक्टोबर 2024 पासून सुमारे 30 टक्के म्हणजेच 81 हजार कोटींनी कमी झाले आहे.

1 ऑक्टोबरपासून निफ्टी 50 निर्देशांक 11 टक्क्यांनी घसरला आहे तर निफ्टीचे मिडपॅप 150 आणि निफ्टी स्मॉलपॅप निर्देशांक अनुक्रमे 17 टक्के आणि 22 टक्क्यांनी घसरले आहेत. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या हिंदुस्थानी समभागांची विक्री हे यामागे प्रमुख असल्याचे उघड झाले आहे.