निवडणूक आयोगाने नुकतील लोकसभा निवडणुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात साडे दहा लाखांपेक्षा अधिक मतं ही रद्द करण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 5 लाख 35 हजार 825 मतं ही पोस्टल मतं होती. तर 5 लाख 22 हजार 513 मतं ही ईव्हीएएम मध्ये पडली होती. लोकसभा निवडणुकीत तीन मतं ही बोगस आढळली होती. तर 9 हजार 634 मतं ही मतदारांच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने दिल्याचे आढळले. 40 मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात आले होते.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 97 कोटी 97 लाथ 51 हजार 847 नोंदणीकृत मतदार होते. 2019 साली 91 कोटी, 19 लाख 50 हजार 734 मतदार होते. 2019 च्या तुलनेत 2024 साली मतदारांच्या संख्येक 7.43 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2024 साली 64 कोटी 64 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर 2019 साली 61 कोटी चार लाख मतदारांनी मतदान केले होते.
2024 लोकसभा निवडणुकीची आकडेवारी
ईव्हीएम आणि पोस्टल व्होट – 64 कोटी 64 लाख 20 हजार 869
ईव्हीएएम व्होट – 64 कोटी 21 लाख 39 हजार 275
पुरुष – 32 कोटी 93 लाख 61 हजार 948
महिला – 31कोटी 27 लाख 64 हजार 269
तृतीयपंथी – 13 हजार 058