अमरनाथ यात्रेसाठी 1 लाख सुरक्षा जवान तैनात

या वर्षी 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी एक लाखावर जवान तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानसुद्धा असतील. याव्यतिरिक्त लष्कर आणि राज्य पोलीस जवानांना अतिरिक्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ही यात्रा 3 जुलै ते 9  ऑगस्ट म्हणजेच श्रावण पौर्णिमेपर्यंत चालेल. अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची प्रकृती उत्तम असायला हवी, ही अट ठेवण्यात आली आहे.