
मणिपूरमध्ये कुकी समाज व सुरक्षा दलात झालेल्या हिंसाचारातक एकाचा मृत्यू झाला असून 27 जवान जखमी झाले आहेत. कांगपोकपी जिल्ह्यातील इंफाळ दिमापूर महामार्गावर 2 जवळ ही घटना घडली.
गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधील सर्व भागातील वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याविरोधात कुकी समाजातील लोकांनी शनिवारी दिमापूर महामार्ग 2 अडवला. तसेच वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर टायर जाळले. या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक वाहने रोखून त्यांची तोडफोड करायला सुरुवात केली. या वेळी झालेल्या हिंसाचारात सेहखोलेन सिंगशिट हा 30 वर्षीय तरुण जखमी झाला होता. त्याला तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या हिंसाचारात तब्बल 27 जवान जखमी झाले आहेत.