क्रिप्टोकरन्सीमध्ये 1.5 अब्ज डॉलरची चोरी

गेल्या काही वर्षांपासून क्रिप्टोकरन्सीमध्ये चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत. हॅकरने जवळपास 1.5 अब्ज डॉलरच्या क्रिप्टोकरन्सीची चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा थेट परिणाम क्रिप्टोकरन्सीवर पडला असून बिटकॉइनसह अनेक क्रिप्टोकरन्सीजमध्ये घसरण झाली आहे. बिटकॉइनच्या किमतीत जवळपास 2 टक्के घसरण होऊन याची किंमत 96,462 डॉलरवर आली. इंटरनॅशनल क्रिप्टो एक्सचेंज बिनान्सवर एथरची किंमत 2.42 टक्के घसरून 2694 डॉलरवर आली.