राज्य सरकारने टोल प्लाझावरची गर्दी कमी करण्यासाठी FASTag सुरू केले. 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. FASTag हा एक RFID निष्क्रिय टॅग आहे जो थेट प्रीपेड किंवा ग्राहकाशी जोडलेल्या बचत/चालू खात्यातून टोल पेमेंट करण्यासाठी वापरला जातो. ते वाहनाच्या विंडोस्क्रीनवर चिकटवले जाणार आणि ग्राहकाला टोल प्लाझामधून कोणत्याही टोल भरण्यासाठी न थांबता वाहन चालविण्यास चालक समर्थ राहिल.
यामध्ये टोल भाडे थेट ग्राहकाच्या बँक लिंक केलेल्या खात्यातून कापले जाणार. FASTag देखील प्रत्येक वाहनासाठी वेगळे असतील आणि एकदा तो वाहनावर चिकटवला की तो दुसऱ्या वाहनात वापर करता येणार नाही. FASTag NETC च्या कोणत्याही बँकेतून खरेदी केला जाऊ शकतो. FASTag प्रीपेड खात्याशी जोडलेले असल्यास ग्राहकाच्या वापरानुसार ते रिचार्ज/टॉप-अप करावे लागेल. यामुळे वाहन चालकाच्या वेळेची बचत होते. FASTag हे असे उपकरण आहे जे वाहन पुढे जात असताना थेट टोल भरण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे (RFID) तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.