
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 21 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन एका आठवडय़ाचे असणार आहे. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यात आला आहे.
मुंबईप्रमाणे आता नागपूरमध्येही विधिमंडळाचे कामकाज संपूर्ण पेपरलेस अन् डिजिटल होणार आहे. त्यासाठी विधान भवनाच्या दोन्ही सभागृहांत तशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. दैनंदिन कामकाज, अहवाल, विधेयके आता आमदारांच्या टेबलवरील स्क्रीनवर एका क्लिकवर उपलब्ध असणार आहेत. तसेच हो किंवा नाही असे मत देण्यासाठी तसेच गैरहजेरीबाबतही सूचित करण्यासाठी प्रत्येकाच्या टेबलवर बटणे लावली गेली आहेत.