
सॅमसंग कंपनीने काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस 25 प्लस या दोन फोनला लाँच केले. परंतु, ग्राहकांनी या दोन फोनमध्ये फास्ट चार्जिंग होत नसल्याची तक्रार केली आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर कंपनीने सुद्धा ही चूक मान्य केली आहे. कंपनी लवकरच यासंबंधीचे सॉफ्टवेअर अपडेट करणार असून ही समस्या सोडवणार आहे. काही यूजर्सच्या मते, फोनला चार्जिंगला लावल्यानंतर आपोआप फास्ट चार्जिंग स्लो होते. ५ए टाईप सी केबलचा वापर करताना ही समस्या जास्त वेळा येत असल्याचे यूजर्सने म्हटले आहे. कंपनीने चार्जिंगवेळी ३ए यूएसबी टाईप सी केबलचा वापर करण्याचा सल्ला ग्राहकांना दिला आहे.