सकाळी भिजवलेले ‘हे’ कडधान्य खा आणि दिवसभर ताजेतवाने राहा!!!

आपल्याकडे अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणून ओळखले जाते. म्हणूनच आहाराच्या बाबतीत आपल्या सवयी या पूर्वापार चालत आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी घरातील जुनी जाणती माणसं सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभरे म्हणजेच चणे खाण्यास सांगायचे. ही एक साधी पण खूप फायदेशीर सवय होती. भिजवलेल्या चण्यांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीर ऊर्जावान आणि निरोगी राहते. भिजवलेले हरभरा खाल्ल्याने शरीराला संपूर्ण पोषण मिळते म्हणूनच त्याला सुपरफूड असंही म्हटलं जातं.
रिकाम्या पोटी भिजवलेले चणे खाल्यामुळे, पचनक्रिया मजबूत होते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि पोटही स्वच्छ होते.
भिजवलेल्या चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जो दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवतो. हे विशेषतः व्यायाम करणाऱ्या किंवा शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

चण्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. म्हणूनच भिजवलेले चणे मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला आहार मानला जातो.

चण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. भिजवलेले चणे नियमित खाल्ल्याने हाडांची कमजोरी दूर होते.

भिजवलेल्या चण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे आजार दूर राहतात आणि शरीर अधिक निरोगी राहते.

चण्यामध्ये प्रथिने, जस्त आणि इतर खनिजे असतात, जे केस आणि त्वचेचे आरोग्य राखतात. हे त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास आणि केसांना मजबूत करण्यास मदत करते.

रात्रभर हरभरा पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मूठभर हरभरा खा.

तुम्हाला कोणताही आजार किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर चणे खाण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.