वृत्तपत्र विक्रेता संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवशाहू प्रतिष्ठान, लोअर परळ वृत्तपत्र विव्रेता संघ आणि उदिष्ठ प्रतिष्ठानतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते. विद्यार्थी आणि पालकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या कार्यक्रमाला भेट दिल्यामुळे उपस्थितांचा आनंद द्विगुणीत झाला. या वेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

भायखळा येथील पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक व निर्माता नितीन वैद्य, विश्वविख्यात वत्ते पवन अग्रवाल, समुपदेशक आरती बनसोडे या दिग्गजांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यशाचा कानमंत्र दिला. या वेळी विश्वस्त जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून, प्रिया पाटील व अमर गावडे यांच्या सहकार्याने करिअर मार्गदर्शन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

या सोहळ्यात डॉ. नीलेश मानकर (समाजसेवक), विलास पाटील (सहकार क्षेत्र), कृष्णकांत शिंदे (ग्राहक सेवा), सुनील शिंदे (शैक्षणिक), संजय चौकेकर, मितेश बगाडिया, रत्नाकर चंदन, संतोष वर्टेकर, सतीश पाटील, मितेश बगाडिया व प्रिया पाटील यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख वितरक बाजीराव दांगट यांच्यासह बृहन्मुंबई वृत्तपत्र संघाचे विजय रावराणे, मधुसूदन सदडेकर, रवि चिले, भालचंद्र पाटे, राजू धावरे, अजय उतेकर, प्रकाश गिलबिले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले तर सर्व कार्यकर्त्यांचे विश्वस्त जीवन भोसले व अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी आभार मानले.