रेल्वेतील नोकरी भरतीला 21 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

रेल्वे भरती मंडळ (आरआरबीएस) 2025 मधील नोकरी भरतीला 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी 16 फेब्रुवारीपर्यंत डेडलाईन होती. या भरती अंतर्गत 1066 जागा भरणार आहेत. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती रेल्वेच्या www.rrbapply.gov.in वर देण्यात आली आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जावून अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांची परीक्षा होणार असून या परीक्षेत व्यावसायिक क्षमता, सामान्य जागरूकता, सामान्य बुद्धिमत्ता, तर्क, गणित आणि सामान्य विज्ञान यासारखे विषय समाविष्ट असतील.