
बेशिस्त दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव बस उलटून झालेल्या अपघातात 36 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जखमींना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लातूर-नांदेड रस्त्यावर दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
लातूरमध्ये बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात झाला आहे. लातूर नांदेड रोडवर हा अपघात झाला असून या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. pic.twitter.com/RLkHj31zIq
— Saamana Online (@SaamanaOnline) March 3, 2025
चाकूरहून लातूरकडे निघालेली बस नांदगाव पाटीजवळ येताच चौफुलीवर अचानक दुचाकीस्वार समोर आला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव बस दुभाजकाला धडकून बाजूच्या रस्त्यावर जाऊन उलटली. बस उलटताच एकच गलका झाला. काच पह्डून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात 36 प्रवासी जखमी झाले. बस उलटताच रस्त्यावरून जाणाऱया वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली.