
नोकऱयांमधील आरक्षण बंद करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हिंसाचारामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून पोलिसांशी झालेल्या चकमकीत 39 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. 2500 हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काठय़ा, रॉड, दगड घेऊन रस्त्यावर फिरणारे आंदोलक बस आणि खासगी वाहने पेटवत आहेत. सध्याचे आरक्षण रद्द करण्याची आणि नागरी सेवा भरती नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणी करणाऱया शेकडो आंदोलकांवर पोलिसांनी प्रथम रबर गोळ्या झाडल्या. मात्र नंतर दंगलखोरांनी प्रत्युत्तर देत पोलिसांना हुसकावून लावले.