पीडितेच्या अंगावर जखमा नाहीत हे आरोपी निष्पाप असल्याचे प्रमाणपत्र होत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका आरोपीला जामीन नाकारला. चंदन चौरसिया, असे या आरोपीचे ऩाव आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा चौरसियावर आरोप आहे. जामीनासाठी त्याने याचिका केली होती. पीडितेच्या अंगावर अत्याचार केल्याच्या जखमा नाहीत, असा दावा चौरसियाने केला होता. हा दावा न्या. मनिष पितळे यांच्या एकल पीठाने फेटाळून लावला. चौरसिया विवाहीत आहे. त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. पीडितेच्या अंगावर जखमा नाहीत हा मुद्दा गौण ठरतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
काय आहे प्रकरण
काही कारणास्तव पीडिता घर सोडून पवई येथे गेली होती. तेथे चौरसिया तिला भेटला. तो तिला हॉटेलवर घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. नंतर त्यानेच पीडितेच्या वडिलांना फोन करुन पीडितेची माहिती दिली. पोलिसांत याची तक्रार करण्यात आली. 17 एप्रिल 2023 रोजी चौरसियाला अटक झाली. जामीनासाठी चौरसियाने याचिका केली होती. मीच पीडितेच्या वडिलांना कॉल करुन तिची माहिती दिली. माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले आहेत, असे चौरसियाचे म्हणणे होते. न्यायालयाने ते मान्य केले नाही.