पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शिनिवारी रात्री 1 च्या सुमारास बिघाड झाला. मुळे पिसे उदंचन केंद्र येथील एकूण कार्यरत 20 पंपांपैकी 6 उदंचन पंप बंद झाले आहेत. पंप दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र पंपांमध्ये बिघाड झाल्यामुळे शनिवार व रविवार मुंबई, ठाणे, भिवंडी महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्यात 15 टक्के कपात होणार आहे.