
कारच्या ऑटोमॅटीक खिडकीत मान अडकून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील चाकिया गावात घडली आहे.
चाकिया गावात राहणाऱ्या रोशन ठाकूर यांनी नुकतीच नवी कोरी बलेनो गाडी घेतली होती. या गाडीची पूजा करण्यासाठी ते कुटुंबासोबत मंदिरात निघाले होते. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा नयन (नाव बदलले आहे) आधीच गाडीत जाऊन बसला होता व खिडकीतून मान बाहेर काढून माकड बघत होता. ठाकूर यांची नवी बलेनो ऑटोमॅटिक असल्याने जशी त्यांनी गाडी सुरू केली, गाडीच्या काचा ऑटोमॅटिक वर होऊ लागल्या. त्यामुळे खिडकी बाहेर बघणाऱ्या नयनची मान खिडकीत अडकली. नयनच्या आईन आरडाओरडा करून रोशनला खिडकी खाली घ्यायला लावली मात्र तोपर्यंत नयन बेशुद्ध पडला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान ठाकूर कुटुंबाने नयनच्या मृत्यूची पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी पोलिसांनी सू मोटो पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे उभाऊँ पोलीस स्टेशनचे प्रभारी राजेंद्र प्रसाद सिंग यांनी सांगितले.