
पहिल्या दोन सामन्यात मिळवलेल्या विजयामुळे हवेत गेलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे रॉकेट गुजरात टायटन्स संघाने खाली उतरवले. बुधवारी झालेल्या लढतीत गुजारतने यजमान बंगळुरूचा घरच्या मैदानावर अक्षरश: धुव्वा उडवला. एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या लढतीत गुजरातने 8 विकेट्सने बाजी मारली.
बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर विजयासाठी 170 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान गुजरातने जोस बटलरच्या वादळी खेळीच्या बळावर 17.5 षटकांमध्ये पूर्ण केले. तत्पूर्वी डीएसपी मोहम्मद सिराजने ‘मियां मॅजिक’ दाखवत आपल्या माजी संघाची बत्ती गुल केली. त्याने बंगळुरूची आघाडीची फळी कापून काढली.
सिराजने 4 षटकात अवघ्या 19 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याने फिल सॉल्ट (14 धावा), देवदत्त पडिक्कल (4 धावा) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (54 धावा) या स्टार फलंदाजांची शिकार केली. सिराजने सॉल्ट आणि पडिक्कलचा त्रिफळा उडवला, तर लिव्हिंगस्टोनला यष्टीरक्षक जोस बटलरच्या हाती झेलबाद केले. या दमदार कामगिरीबद्दल त्याचा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यशस्वी जैस्वालनं ‘मुंबई’ सोडली, IPL च्या मध्यावरच घेतलेल्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात खळबळ
मोहम्मद सिराज हा गेल्या 7 हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करत होता. मात्र आयपीएलच्या 18व्या हंगामापूर्वी त्याला संघाने रिटेन केले नाही. मेगा ऑक्शनमध्ये 12.25 कोटी मोजून गुजरात टायटन्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. आता यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच आपल्या माजी संघाविरुद्ध मैदानात उतरलेल्या सिराजने आग ओकणारी गोलंदाजी केली. यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.
Siraj against RCB pic.twitter.com/OWKdkiTu4f
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) April 2, 2025
3 stumps for Siraj today #RCBvsGT pic.twitter.com/I3KGITscdu
— Binod (@wittybinod) April 2, 2025
विशेष म्हणजे यात गुजरात टायटन्स संघानेही हात धुवून घेतला आहे. सिराजने फिल सॉल्टचा त्रिफळा उडवताच गुजरातने आपल्या सोशल मीडियावर एक मिम्स शेअर केला. स्टम्प सिराजला म्हणतोय की, ‘मुझे क्यू तोडा?’, असे कॅप्शन देऊन सॉल्टचा त्रिफळा उडवलेला फोटो शेअर करण्यात आला आहे.
Stumps to Siraj tonight – ? pic.twitter.com/9HUb5mfohS
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 2, 2025
झहीर खानचा विक्रम मोडला
दरम्यान, मोहम्मद सिराज याने माजी वेगवान गोलंदाज झहीर खानचा विक्रम मोडला असून आयपीएलमध्ये एम. चिन्नास्वामी मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. सिराजच्या खात्यात आता 29 विकेटची नोंद असून झहीरने एम. चिन्नस्वामीवर 28 विकेट्स घेतलेल्या आहेत. चिन्नास्वामीवर सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम युझवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने या मैदानावर 52 विकेट्स घेतलेल्या आहेत.