झटका! ऑक्सिस बँकेची व्याजदरात कपात

ऑक्सिस बँकेने ग्राहकांना झटका दिला आहे. बँकेने मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदर कपात केलीय. कपातीच्या निर्णयानंतर आता एफडीवर सामान्य खातेधारकांना 3 ते 7.05 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.65 टक्के व्याज मिळेल. हे व्याजदर 23 एप्रिलपर्यंत लागू होतील. आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर आता बँकांही एफडी व्याजदर कमी केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला. याआधी एचडीएफसी बँकेने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर कमी केले आहेत.