‘क्रिप्टोक्वीन’वर एफबीआयचे 5 लाख डॉलर्सचे बक्षीस; 175 देशांतील लोकांना लावला 4 अब्ज डॉलरचा चुना

आर्थिक फसवणूक करणाऱ्यांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलाही आहेत. बल्गेरियन महिला रुजा इग्नाटोवा हिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एफबीआयने मोस्ट वॉण्टेडच्या यादीत तिला टाकले असून तिच्यावर तब्बल 5 लाख डॉलर्स म्हणजेच 41 कोटी 72 लाख 42 हजार 250 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. रुजा इग्नाटोवाला ‘क्रिप्टोक्वीन’ म्हणून ओळखले जाते. रुजा इग्नाटोवावर बनावट क्रिप्टोकरन्सी वन कॉईनद्वारे 175 देशांतील लोकांकडून 4 अब्ज डॉलरहून अधिक किमतीची गुंतवणूक घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. तिने 2014 मध्ये आभासी चलन लाँच केले होते.