आमदार झिशान सिद्दिकी यांची हकालपट्टी, युवक काँग्रेस अध्यक्ष पदावरून उलचबांगडी

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी हे काँग्रेसमध्येच आहेत. पण झिशान सिद्दिकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. सिद्दिकी यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या पक्षांतरामुळे झिशान सिद्दिकी हेसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांना हटवून त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी यासंदर्भातील घोषणा केली. मुंबई युवक काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून कार्याध्यक्षपदी सुफियान मोहसीन हैदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.