सलमान खानला झेड प्लस सिक्युरीटी, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सरकारचा निर्णय

अभिनेता सलमान खानला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खान सतत लॉरेन्स बिष्णोई गँगच्या टार्गेटवर आहे. सलमान खानसोबत मैत्री असल्यानेच बिष्णोई गँगने बाबा सिद्दीकींची हत्या केली आहे.

झेड प्लस सिक्युरीटीमध्ये सलमानच्या सुरक्षेसाठी 30 सुरक्षा कर्मचारी असतील. या मध्ये 10 एनएसजी कमांडे आणि पोलीस असतील, जे दोन शिफ्टमध्ये काम करतील. या सुरक्षा दलाकडे पाच गाड्या असतील ज्यात बुलेटप्रूफ गाड्यांचाही समावेश असणार आहे.

यासाठी वर्षाला पाच कोटी रुपये खर्च येईल असे सांगण्यात येत आहे. झेड प्लस सिक्युरीटमध्ये मुंबई पोलीस, जवान, सलमान खानचे वैयक्तिक सुरक्षा रक्षकांचाही समावेश असणार आहे.