चोरलेल्या 3 मोटरसायकल जप्त; एका युवकाला अटक

चोरीच्या गुन्ह्यातील सराईत युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने चोरलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या. चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिनांक 29 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अमजद उर्फ इस्माईल पटेल हा बाभळगाव नाका,रिंग रोड परिसरात फिरत आहे.अमजद उर्फ इस्माईल गफूर पटेल, वय 29 वर्ष राहणार रावणगाव, तालुका उदगीर जिल्हा लातूर सध्या राहणार वैशाली नगर, बाभळगाव तालुका जिल्हा लातूर यास ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले की, सदरची मोटर सायकल काही दिवसापूर्वी लातूर शहरातून चोरी केलेली आहे. तसेच लातूर शहरातील विविध ठिकाणाहून त्याच्या आणखीन मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेल्या मोटारसायकल बाबत विचारपूस करुन नमूद आरोपीकडून चोरीच्या आणखीन इतर 2 अशा मिळून एकूण 3 विविध कंपनीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 70 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मोटार सायकल चोरीचे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील मोटार सायकल चोरीचा एक , एमआयडीसी पोलीस ठाणे मधील मोटरसायकल चोरी एक गुन्हा व गांधी चौक पोलीस ठाण्याला दाखल असलेला मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नकुल पाटील यांनी पार पाडली.