Ind Vs Ban 2nd Test 2024 – BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाचे हे 3 खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत

टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीला 27 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कानपूरला पोहचले आहेत. या दरम्यान बीसीसीआयने एक मोठा निर्णय जाहीर करत दुसऱ्या कसोटी सामन्यातून टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना बाहेर केले आहे.

BCCI ने मंगळवारी (24 सप्टेंबर 2024) Irani Cup 2024 साठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या संघांची घोषणा केली आहे. या संघांमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात असणाऱ्या तीन खेळाडूंचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. या तीन खेळाडूंमध्ये सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांचा समावेश आहे. सरफराज खानची मुंबईच्या संघात निवड करण्यात आली आहे. तसेच ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे रेस्ट ऑफ इंडिया या संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहेत.

सरफराज खान, यश दयाल आणि ध्रुव जुरेल यांची इराणी कपसाठी निवड करण्यात आल्यामुळे त्यांच्या जागेवर श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि शार्दुल ठाकुरसह अन्य खेळाडूंची टीम इंडियाच्या कसोटी संघात निवड होण्याची शक्यता आहे.