पुन्हा हिंदुस्थानात पाऊल ठेवणार नाही! महिला टेनिसपटूच्या विधानाने वादाची ठिणगी

सर्बियाची स्टार महिला टेनिस खेळाडू डेजाना राडानोविक (Dejana Radanovic) ही आयटीएफ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी हिंदुस्थानमध्ये आली होती. मात्र या स्पर्धानंतर तिने हिंदुस्थानबाबत केलेल्या विधानामुळे वादाची ठिणगी पडली आहे.

डेजाना राडानोविक ही सर्बियाची टेनिस खेळाडू आहे. बंगळुरू, पुणे, इंदूर आणि मुंबईसारख्या शहरात आयोजित आयटीएफ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी ती हिंदुस्थानात आली होती. या स्पर्धेनंतर तिने काही इन्स्टा स्टोरी ठेवल्या होत्या आणि त्यामुळे वाद सुरू झाला.

डेजाना राडानोविक हिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हिंदुस्थानात आपल्याला वाईट अनुभव आल्याचे म्हटले. यामुळे तिच्यावर वर्णद्वेषी असल्याचा आरोप सुरू असून तिने माफी मागावी अशी मागणी होत आहे. डेजानाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हिंदुस्थानातील खाद्यपदार्थ, ट्राफिक आणि अस्वच्छतेची निंदा केली. यासोबत तिने एका विमानतळाचा फोटो शेअर करत आपण पुन्हा कधीही हिंदुस्थानात येणार नसल्याचे म्हटले.

 

अन्य एका इन्स्टा स्टोरीमध्ये ती म्हणते, ज्यांनी 3 आठवड्यांहून अधिक काळ हिंदुस्थानसारख्या देशात घालवले आहेत तेच माझी भावना समजू शकतात. मला हिंदुस्थानातील खाद्यपदार्थ, ट्राफिक आणि स्वच्छेता अजिबात आवडली नाही. हॉटेलमधील खाद्यपदार्थ, पिवळ्या उशा, घाणेरडे बेड लिनन… इथे कसे रहायचे? असे मला वाटायचे, असेही ती म्हणाली.

मात्र तिने हिंदुस्थानातील ड्रायव्हर्सची प्रशंसा केली. मला हे मान्य करावे लागेल की हिंदुस्थानातील ड्रायव्हर्स अप्रतिम आहेत आणि ट्राफिक काही वेळा मनोरंजकही असते. तुमचा दिवस कसा जाईल, काय होणार काही कळत नाही. प्रत्येकजण रश गेमप्रमाणे हॉर्न वाजत असतो, असा आरोपही तिने केला. यामुले तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Meet Dejana Radanovic: Serbian Tennis Star Who Went Viral For Making Racist Comments Against India - In Pics | News | Zee News

दरम्यान, ट्रोलिंगनंतर डेजानाने म्हटले की, या टिप्पण्या हिंदुस्थानातील लोकांबाबत नसून देशाबद्दल आहेत. हिंदुस्थानातील लोकं मला आवडतात आणि त्यांच्यासोबत मी चांगला वेळही घालवला आहे.

Meet Dejana Radanovic: Serbian Tennis Star Who Went Viral For Making Racist Comments Against India - In Pics | News | Zee News

वर्णद्वेषी असल्याचा आरोपही डेजानाने फेटाळून लावला. जर हिंदुस्थानातील कोणी सर्बियात आले आणि त्यांना येथील गोष्टी आवडल्या तर… तर याचा अर्थ तुम्ही वर्णद्वेषी आहात का? याचा वर्णद्वेषाशी काय संबंध? असा सवाल तर डेजानाने माझे सर्व जाती, धर्माच्या आणि रंगाच्या लोकांवर प्रेम असल्याचे म्हटले.