वरळीत पैठणीचा खेळ रंगला दादूसच्या संगे…14 भाग्यवान महिलांना मिळाली मानाची पैठणी

जागतिक महिला दिनानिमित्त वरळीतील जांबोरी मैदानावर शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे यांनी आयोजित केलेल्या ‘पैठणीचा खेळ रंगे.. दादूसच्या संगे’ या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दादूसच्या गीतांना मनापासून दाद देत ठेका धरला. उपस्थितांपैकी 14 भाग्यवान महिलांना मानाची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते आमदार सचिन अहिर, मनोज जामसुतकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, अरविंद भोसले, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस संजय कदम, सहचिटणीस निशिकांत शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुची राऊत, अश्विनी पवार, प्रियांका जोशी, पवन जाधव, युवासेनेच्या अयोध्या पोळ, राजवी लाड, शार्दुल म्हाडगुत, रणजित कदम, रुणाल लाड तर वरळी विधानसभेतील अनुपमा परब, निरंजन नलावडे, छाया कोळी, राम साळगावकर, विनिता चव्हाण, ज्योती दळवी, आकर्षिका पाटील, अभिजित पाटील, शाखाप्रमुख विजय भणगे, जिवबा केसरकर, गोपाळ खाडे, रामकृष्ण शिंदे, दीपक बागवे, सूर्यकांत कोळी आदी उपस्थित होते.